Ahilyanagar : बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
संगमनेर तालुक्यातील जवळेकडलग गावात बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सिद्धेश कडलग असं मृत्यू झालेल्या चिमुरड्याचं नाव आहे. सिद्धेश घरासमोर खेळत असताना बिबट्याने अचानक त्याच्यावर झडप घातली.
बिबट्याने त्याला तोंडात घट्ट पकडून शेजारील गवताच्या शेतात नेलं. ही घटना लक्षात येताच घरातील महिलांनी आरडाओरड केली. आरडाओरड होताच बिबट्याने सिद्धेशला त्या ठिकाणीच सोडून पळ काढला. त्यानंतर जखमी अवस्थेत सिद्धेशला तात्काळ घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र मानेला गंभीर जखमा झाल्याने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं.

टिप्पणी पोस्ट करा