NASHIK | चांदवड ते मनमाड महाराष्ट्र राज्य महामार्ग खड्ड्यांमुळे बनला नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा चांदवड ते मनमाड महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक 752 जी हा रस्ता काही ठिकाणी कामाअभावी अपूर्ण असल्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचा मृत्यूचा सापळा बनला आहे.
चांदवड ते मनमाड हा रस्ता 25 किलोमीटर अंतराचा असून मात्र या रस्त्यामध्ये दोन ठिकाणी एक निकम वस्ती हर्नुल टोलनाक्याजवळ, व दुसरे शिंगवे वनीकरण विभाग या दोन ठिकाणी काम अपूर्ण असल्यामुळे त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले असून त्यामध्ये रात्रीचेच नव्हे तर दिवसादेखील ते खड्डे दिसत नसल्यामुळे मोटर सायकलच्या मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहे व घडले आहे.
तर त्या खड्ड्यांमध्ये आत्तापर्यंत 100 सव्वाशे प्रवासी पडून काहींचे हात पाय कंबर मोडले गेले आहे, तर काही तर मृत्युमुखी पडले अशा प्रकारचे खड्ड्यांमुळे नागरिकांचा व प्रवाशांचा नाहक जीव जातो त्यामुळे याकडे संबंधित विभागाचे अधिकारी व शासन लक्ष देईल का हा प्रश्न मात्र प्रवाश्यांना पडला आहे.
तर या तालुक्यातील राजकीय क्षेत्रातील आमदार खासदार व छोटे मोठे राजकीय पुढारी म्हणून समजणारे यांना या रस्त्यावर पडलेले खड्डे दिसत नाही का असा सवाल नागापूर येथील विजय दखणे व साहेबराव रमण आहेर शिंगवे यांनी आपली प्रतिक्रिया मांडली.
तरी या रस्त्यावरील खड्डे पडलेले आहे असे खड्डे जर आमच्या नांदगाव तालुक्यात रस्त्यावर पडले असते तर आमचे आमदार यांनी स्वतःच्या निधीचा वापर करून खड्डे बुजवले असते अशी प्रतिक्रिया विजय दखणे नागापूर यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा