DLM ADVT

0

 

Beed : सोलापूर - धुळे महामार्गावर लुटमार व बॅग लंपास करण्याच्या घटना वाढल्या. सोलापूर ते धुळे महामार्गावर पाचोड ते येडशी यादरम्यान प्रवासी वाहन अडवून अथवा थांबलेल्या वाहनातील प्रवाशांना धमकावून लूटमार केली जात आहे.. याबरोबरच ट्रॅव्हल्स वर ठेवलेल्या बॅग लंपास करण्याच्या घटना घडत आहेत याबाबत आता बीड पोलिसांनी मोहीम हाती घेतले असून अशा पद्धतीने चोरी करणाऱ्यांचा करणाऱ्या टोळीचा शोध घेतला जात आहे..

 यासाठी हॉटेल चालकांची देखील मदत घेतली जात असून सीसीटीव्ही कार्यान्वित करण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत याबरोबरच प्रवाशांनी देखील खबरदारी घ्यावी असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे..

- ज्या ठिकाणी जेवणासाठी ट्रॅव्हल्स थांबते ती निघण्यापूर्वी ट्रॅव्हल्स छतावर जाऊन थांबतो त्यानंतर काही अंतरावर ही गाडी जातात प्रवाशांच्या बॅग काढून खाली टाकल्या जातात.. खाली असलेले साथीदार या बॅग गोळा करतात आणि त्यातील मौल्यवान वस्तू लंपास करतात.. टोलनाक्यावर अथवा चढाच्या ठिकाणी गाडीची गती कमी होतात वरचा चोरटा उतरून पसार होतो..

- तर काही वेळेस चालत्या गाडीच्या पाठीमागे हे चोरटे दुचाकीवरून येऊन शिडीच्या माध्यमातून वरती चढून बॅग लंपास करतात..

- सोलापूर - धुळे महामार्गावर बाहेर राज्यातून येणारे प्रवासी एखाद्या बंद हॉटेल समोर गाडी थांबवून गाडीतच आराम करतात अशा प्रवाशांना चाकूचा अथवा शास्त्राचा भाग दाखवून लुटमार केली जाते.


टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top