जालना जिल्ह्यातील दरेगाव येथे धनगर समाजाचे नेते दीपक बोऱ्हाडे यांची चारचाकी गाडी फोडल्याची घटना समोर आली आहे. ही गाडी मध्यरात्री फोडली असल्याची माहिती धनगर समाजाचे नेते दीपक बोऱ्हाडे यांनी स्वतः दिली आहे. गाडी भारतीय जनता पार्टीचे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या कार्यकर्त्यांनी फोडली असल्याचा आरोप याप्रसंगी दीपक बोऱ्हाडे यांनी केला
असून दोन ते तीन दिवसांपासून हा कार्यकर्ता सोशल मीडियाच्या माध्यमातून गाडी फोडण्याच्या धमक्या देत होता. गाडी पार्किंग मध्ये उभी असताना मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडवून आणली आहे. या संदर्भात दीपक बोऱ्हाडे यांनी भाजपा नेते रावसाहेब पाटील दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्याच कार्यकर्त्यांनी ही गाडी फोडली असल्याचा आरोप याप्रसंगी त्यांनी करत पोलीस काय कारवाई करतात असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा