Sindhudurg : डॉक्टरांच्या हयगयीपणामुळे युवतीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत, युवतीच्या नातेवाईकांसह संतप्त ग्रामस्थांनी कणकवली शहरातील खासगी रूग्णालयातील डॉक्टरांच्या केबिनला घेराव घातला. तोडफोड केल्याची तसेच युवतीचा मृतदेह रूग्णालयाच्या दारात ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली.
डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळेच युवतीचा मृत्यू झाला आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कणकवली पोलिसांनीही सदर खाजगी रुग्णालय गाठले. पोलीस ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, ग्रामस्थ ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यामुळे ग्रामस्थांनी त्या रुग्णालयाची तोडफोड केली. याबाबत कणकवली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा