DLM ADVT

0

 



 


OBC Mandal Yatra | Raj Rajapurkar | Devendra Fadnavis | Chandrashekhar Bawankule | Sharad Pawar | Buldhana | Maharashtra | देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तुम्ही आणि तुमच्या पक्षाने (BJP Party) ओबीसींचं आरक्षण (OBC Reservation) नाकारलं होतं, मंडळ यात्रा (Mandal Yatra) | ओबीसी आंदोलन (OBC Protest) मधून राज राजापूरकर (Raj Rajapurkar) यांचा आरोप
  • राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCP Sharad Pawar Party) वतीने नागपूर (Nagpur) मधून मंडल यात्रा (Mandal Yatra 2025) ला सुरुवात झाली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते काल या यात्रेला सुरुवात करण्यात आली. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर (Raj Rajapurkar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

त्यांनी कमंडल दाखवत मुख्यमंत्र्यांना खुलं चॅलेंज दिलं आहे. माझा खुला आरोप आहे की, देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आणि तुमच्या पक्षाने ओबीसींचं आरक्षण नाकारलं होतं असे राजापूरकर म्हणाले.

आज मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलच्या वतीने काढण्यात आलेली ओबीसी जनजागरण मंडल अभियान यात्रा (OBC Awareness Campaign Yatra) शेगाव (Shegaon) येथे पोहोचली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलच्या वतीने ओबीसी जनजागरण मंडल अभियान यात्रेला शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत नागपूर येथुन १० ऑगस्ट रोजी सुरुवात करण्यात आली. हि यात्रा महाराष्ट्रातील संपूर्ण 36 जिल्ह्यात (36 Districts Maharashtra) जाणार आहे. आज बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात देखील ही यात्रा पोहोचली आहे.

यावेळी ओबीसी बांधवांकडून या यात्रेचे स्वागत करण्यात आले आहे. यावेळी ओबीसी च्या घोषणा देत ओबीसी ची जातीनिहाय जनगणना (OBC Caste Census Demand) व्हायला पाहिजे अशी मागणी बांधवांनी केली.

दरम्यान देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) साहेब तुम्ही आणि तुमच्या पक्षाने ओबीसींचा आरक्षण नाकारलं होतं, हे वास्तविक सत्य असल्याचे मत राज राजापूरकर (Raj Rajapurkar) यांनी व्यक्त केले आहे.

यावेळी बोलताना त्यांनी भाजपाचे नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या टीकेला ही प्रत्युत्तर दिले.

शेगाव पोचल्यानंतर सर्वप्रथम श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे मंडळी यात्रेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane), माजी आमदार रेखाताई खेडेकर (Rekha Khedekar), सहकार नेते पांडुरंगदादा पाटील (Pandurang Patil), प्रसन्नजीत पाटील (Prasannajit Patil), संगीतराव भोंगळ (Sangeet Bhongal) आदींची उपस्थिती होती.

BYTE – राज राजापूरकर (Raj Rajapurkar, NCP Sharad Pawar Party OBC President)

#OBCReservation #MandalYatra #DevendraFadnavis #SharadPawar #MaharashtraPolitics


टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top