- अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक द्वारे विविध मागण्यांसाठी अमरावतीच्या महिला व बालकल्याण भवना समोर अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी एक दिवसीय धरणे आंदोलन करत प्रलंबित मागण्यासाठी एल्गार पुकारला आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत एखादी महिला अपात्र झाल्यास गावात वैर निर्माण होते. FRS ची अनिवार्यता तात्काळ रद्द करावी, प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे काम करण्याची सक्ती अंगणवाडी सेविकांना करू नये. यासह विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी मागण्यांसंदर्भात घोषणाबाजी देऊन वारंवार हक्कांच्या मागण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर येत असल्याच्या भावना यावेळी अंगणवाडी सेविकांनी बोलून दाखवली.

टिप्पणी पोस्ट करा