मुंबई (भाऊचा धक्का) ते विजयदुर्ग रो-रो बोटसेवा अंतर्गत “एम टू एम” ही “प्रिन्सेस” बोट आज संध्याकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी विजयदुर्ग बंदरात दाखल झाली. मुंबईहून निघालेल्या या बोटीची जयगड आणि विजयदुर्ग या ठिकाणी चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली आहे.
राज्याचे बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतील ही सागरी रो रो सेवा कोकणच्या पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा