- छत्रपती संभाजी नगर शहरामध्ये शाळा महाविद्यालयाच्या परिसरामध्ये सर्रास चरस गांज्या विक्री होत असल्याची तक्रारी वाढल्या होत्या. खुद्द पालकमंत्री संजय शिरसाट, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार कल्याण काळे, आ. प्रदीप जयस्वाल या नेत्यांनी गणेश महासंघाच्या बैठकीमध्ये पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
यामुळे छत्रपती संभाजी नगर शहरातील पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. शहरातील विविध ठिकाणी होणाऱ्या चरस गांजांच्या अड्ड्यांवर पोलिसांनी छापीमारी सुरू केली आहे. यातील तीन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. चरस, गांजाची विक्री करून परिसरात दहशत निर्माण करत होते. त्याच भागात पोलिसांनी आरोपींची धिंड काढली. ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांच्या पथकाने केली.

टिप्पणी पोस्ट करा