- बीडमध्ये ओबीसी बांधव आक्रमक झाले आहेत. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी बांधवांनी मोर्चा काढला आहे. तर यावेळी काल सरकारने काढलेल्या जीआरची होळी करण्यात आली आहे.
ओबीसी प्रवर्गात घुसखोरी नको, सरकारने काढलेला जीआर तात्काळ रद्द करावा, मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, असं म्हणत यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात देखील घोषणाबाजी करण्यात आली आहे.
दरम्यान, सरकारने तात्काळ हा काढलेला जीआर रद्द केला नाही, तर ओबीसी रस्त्यावर उतरून यापेक्षा तीव्र आंदोलन करेल, असा इशारा देखील यावेळी आंदोलकांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा