बीडच्या परळी रेल्वे स्थानक परिसरात ६ वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आज नागरिकांकडूनच परळी बंदची हाक देण्यात आली आहे. 31 ऑगस्ट रोजी आई-वडिलांसोबत आलेल्या ६ वर्षाच्या चिमुकलीवर नराधमाकडून अत्याचार करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत त्याला पाच तासातच अटक केली.
आता हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालून सदरील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी आज दिवसभर परळीतील बाजारपेठ दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांकडून आज लक्ष्मीबाई टॉवर चौक ते रेल्वे स्थानक परिसरात मूक मोर्चा देखील काढण्यात आला आहे. आजच्या परळी बंदला विविध पक्ष आणि संघटनांनी या आधीच पाठिंबा जाहीर केला आहे. तर मुक मोर्च्यात नागरिकांचा मोठा सहभाग घेत झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.
टिप्पणी पोस्ट करा