KOLHAPUR | कोल्हापुरात गर्भवती महिलेवर दुहेरी शस्त्रक्रिया यशस्वी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयातील घडलेली घटना म्हणजे नियतीवर मात करणाऱ्या मातृत्वाची अद्भुत कहाणी आहे. कोल्हापूरच्या पुलाची शिरोली येथील आणि मूळच्या धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील 24 वर्षीय दीपाली पाटोळे नऊ महिन्यांची गर्भवती असताना अचानक मेंदूत रक्तस्राव होऊन गंभीर परिस्थितीत सीपीआरमध्ये दाखल झाली.
सर्व तपासण्या करुन डॉक्टरांनी प्रथम सिझेरियन करून निरोगी बाळाला जन्म दिला आणि तत्काळ मेंदूची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडत आई-बाळ दोघांना जीवनदान दिले. सहा विभागांतील 15 हून अधिक डॉक्टरांच्या समन्वयातून ही दुहेरी शस्त्रक्रिया पार पडली आहे. ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आल्याने गरीब कुटुंबावरचा लाखोंचा आर्थिक बोजा टळला. यानिमित्ताने आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या पथकाचा सत्कार केला असून, सीपीआरवर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे.

टिप्पणी पोस्ट करा