अमरावती शहरात वाढत्या हत्येच्या घटनेने सर्वत्र भीतीच वातावरण पसरल आहे. राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील शंकरनगर परिसरातील वैभव कॉलनी येथे महिलेची हत्या 30डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. 45वर्षीय नीलिमा संजय खरबडे नामक महिलेची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली.
नीलिमा या वैभव कॉलनी येथील घरी एकट्याच राहत होत्या. रविवारी सायंकाळी नीलिमा यांच्या बहिणीचा मुलगा त्यांना भेटण्यासाठी त्यांच्याकडे आला. त्यावेळी त्याला त्या मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांच्या शरीरावर धारदार शस्त्राचे वार दिसून आले.
अशात तातडीने घटनेची माहिती राजापेठ पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच राजापेठचे ठाणेदार पुनीत कुलट सह गुन्हे शाखा पोलिसांनी आपल्या पथकासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलीस उपायुक्त गणेश शिंदे शाम घुगे यांनी सुद्धा घटना स्थळी धाव घेऊन पाहणी केली.

टिप्पणी पोस्ट करा