DLM ADVT

0

संगमनेर  तालुक्याच्या पठार भागातील पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत घारगांव जवळील मुळानदीच्या पुलाखाली गोडस अशा ४ ते ५ महिन्याच्या वयाच्या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला.

मुळानदीकडे गेलेल्या काही नागरिकांच्या निदर्शनास हा मृतदेह येताच त्यांनी तातडीने घारगांव पोलीस ठाण्याला माहिती दिली. माहिती मिळताच घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मात्र या चिमुकल्याची ओळख पटू शकलेली नाही. या मुलाबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्वरित घारगांव पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात यांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top