AMRAVATI | अमरावतीच्या शिवणगाव मध्ये पुन्हा भूकंप सदृश्य धक्के.... तीन महिन्यात चार भूकंप सदृश्य धक्क्याने गावात भीतीच वातावरण- अमरावतीच्या शिवनगाव मध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे झटके आले आहे. सकाळी १२.७ मिनिटाने हा झटका आला असून, यापूर्वी बरोबर २४, २५ नोव्हेंबर रोजी हे झटके जाणवले होते.
तीन महिन्यात चार वेळा हे भूकंप सदृश्य धक्के जाणवल्याने गावात भीतीच वातावरण निर्माण झाल आहे, महिन्याभरापूर्वी जिवॉलॉजिकल टीम सुद्धा शिवणगाव येथे येऊन आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेटी देऊन तपास केला होता. मात्र कोणतेही ठोस माहिती पुढे आली नाही त्यानंतर आताही झटके येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
प्रशासनाने शिवणगाव, शिरजगाव मोझरी येथे मुकंप मापक यंत्र बसवण्यात येणार असल्याचे अश्वासन दिले होते. मात्र अद्याप हे यंत्र बसवण्यात आले नाही, त्यामुळे हे यंत्र तातडीने बसवण्याची मागणी सरपंच धर्मराज खडसे आणि सामाजिक कार्यकर्ता प्रशांत कांबळे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा