DHULE | रोडरोमीओंच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थीनी शाळेत जात नसल्याचा धक्कादायक प्रकापोलिसांच्या निष्क्रियतेविरोधात पालकांचा ठिय्या रोडरोमीओंच्या त्रासाला कंटाळून मुली शाळेत जात नसल्याचा धक्कादायक प्रकार धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात बेल्हाणे गावात घडला आहे. रोडरोमिओ विद्यार्थीनींची छेड काढत असल्याने दोन महिन्यांपासून विद्यार्थीनी शाळेत जात नसल्याने पालकांनी पिंपळनेर पोलीसात तक्रार दिली होती.
मात्र पोलिसांनी तक्रारीची कुठली दखल घेतली नसल्याने आज पुन्हा पालक संतप्त होत पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या मांडून रोष व्यक्त करत आहेत. पोलिसांकडून त्या रोडरोमिओंची पाठराखण होत असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे.
पोलिस स्टेशन बाहेर मोठ्याप्रमाणात जमाव एकत्रित आला होता. मोठ्या प्रमाणात रोडरोमीओंचा त्रास वाढला असतांना पोलिस मुग गिळून गप्प का बसले? असा प्रश्न यावेळी पालकांकडून व्यक्त होत आहे.पोलीस स्टेशनच्या बाहेर बसून महिलांसह पालकांनी रोडमिओंवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
.jpg)
टिप्पणी पोस्ट करा