DLM ADVT

0

 

BULDHANA | जिवंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी वृद्ध महिलेची परवड - मुलानेच स्वयंघोषित घोषणा पत्रावर जिवंत आईच्या मृत्यूची नोंद बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद नगरपरिषदेत केली आणि नगर परिषदेने ही कुठलीही शहनिशा न करता मुलाला जिवंत वृद्धेच मृत्यू प्रमाणपत्र दिल, आणि याच मुलाने आईच्या खात्यात जमा असलेले दहा लाख रुपये उडवले व आपल्या जिवंत आईला रस्त्यावर सोडून पसार झाला, ही धक्कादायक घटना घडलीये जळगाव जामोद शहरात...! 

प्रेमसिंह कमल सिंह राजपूत या व्यक्तीने आपली आई पाच ऑक्टोबर 2023 रोजी मृत्यू पावल्याचं स्वयंघोषणापत्र 23 नोव्हेंबर 2023 रोजी जळगाव जामोद नगर परिषदेत देऊन आईच्या मृत्यूची नोंद केली, जळगाव जामोद नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांनी कुठलीही शहनिशा न करता जिवंत वृद्धेच्या मृत्यूची नोंद करून तसं प्रमाणपत्र ही या मुलाला देऊन टाकलं. प्रेमसिंह राजपूती याने आपल्या आईच्या मृत्यूच्या प्रमाणपत्राच्या आधारे आईच्या खात्यात ठेव म्हणून जमा असलेले दहा लाख रुपये बँकेतून काढून पसार झाला.. 

ही बाब ज्यावेळी जिवंत असलेल्या कौशल्याबाई राजपूत यांना माहिती पडली तेव्हा त्यांनी नगरपरिषदेत स्वतःच्याच मृत्यूचे प्रमाणपत्रासाठी स्वतःच्या नावाने अर्ज केला व विशेष म्हणजे नगर परिषदेने हे प्रमाणपत्र ही कौशल्य बाईंना जिवंत असताना मृत्यू झाल्याचे प्रमाणपत्र देऊन टाकलं...! 75 वर्षीय कौशल्याबाई यांनी बँकेत चौकशी केली असता बँकेतील दहा लाख रुपये ही त्यांचा मुलगा प्रेमसिंह याने काढून पसार झाल्याची माहिती मिळाली त्यावेळेस कौशल्या बाईंच्या पायाखालची जमीन सरकली.. 

कौशल्याबाई या आता एकट्याच एकाकी जीवन जगत आहेत.. विशेष म्हणजे स्वतःच्या मृत्यूचे प्रमाणपत्र जळगाव जामोद नगर परिषदेकडे जिवंतपणी मागण्याची वेळ कौशल्या बाईंवर आली.. या संपूर्ण प्रकरणामुळे आता स्वतःचं घर विकून बँकेत दहा लाख रुपये ठेवलेल्या कौशल्याबाई या एकाकी जीवन जगत असून त्यांना कुणाचाही सहारा उरलेला नाही.. मात्र या सगळ्या प्रकारामुळे नगरपरिषदेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

या संपूर्ण घटनेनंतर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी नगरपालिका प्रशासनाने जळगाव जामोद पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सदर मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोबतच मृत्यूच दिलेल प्रमाणपत्र देखील रद्द करण्यात आल आहे. 75 वर्षीय महिलेने 9 ऑक्टोबर रोजी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मुलाविरुद्ध देखील आता गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती आहे. या संपूर्ण घटनेने जिल्ह्यात मुलाविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top