Chhatrapati Sambhajinagar : ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाची नायलॉन मांजा विरोधात धडक मोहीम,गुन्हे दाखल करणे सुरू पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांच्या आदेशाने छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील विविध ठिकाणी छापे मारून नायलॉन मांजा विकणाऱ्यावर कारवाई करणे सुरू
असून यामध्ये सहा गुन्हे दाखल केले असून 28 हजारापर्यंतचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नायलॉन मांजामुळे अनेकांना इजा होत आहे.
नायलॉन व सिंथेटिक मांजा वापरू नये, या वापराने स्वतःचा जीव तर धोक्यात घालतोच परंतू वयोवृद्ध,लहान, दुचाकी स्वार, पशुपक्षी यांच्या जीवितास धोका निर्माण करत आहात, असे केल्यास कायद्या ने गुन्हा दाखल करण्यात येणार अशी माहिती पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी दिली आहे .

टिप्पणी पोस्ट करा