सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षण संदर्भात बाजू मांडणारे तथा ओबीसी चळवळीत काम करणाऱ्या ॲड. मंगेश ससाणे यांच्या गाडीवर बीडच्या माजलगाव - धारूर महामार्गावर हल्ला करण्यात आलाय.
दोन दुचाकींवर आलेल्या हल्लेखोरांनी गाडीवर दगडे मारली, यामध्ये ॲड. ससाणे यांच्या इन्होवा गाडीच्या काचा फुटल्या आहेत. मात्र वेळीच गाडीचा वेग वाढविल्याने सुदैवाने त्यांच्यासह सहकाऱ्यांना काही झालं नाही..
ॲड. मंगेश ससाणे हे ओबीसी आंदोलक पवन करवर, यांच्यावर माजलगाव परिसरात २ महिन्यापूर्वी झालेल्याहल्ल्यातील आरोपी अद्याप अटक नसल्याने, माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आले होते. यादरम्यान पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करून, ठाण्यातून परतत असताना त्यांच्या गाडीवर हा हल्ला करण्यात आलाय..
तर पवन करवर यांच्यावर झालेल्या हल्ल्या संदर्भात आरोपीना अटक होत नाही म्हणून माजलगाव पोलीस स्टेशनला जाब विचारल्याच्या रागातून हल्ला झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तर याप्रकरणी बीडच्या धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलाय..
दरम्यान या अगोदरही बीड जिल्ह्यासह जालना, अहिल्यानगर येथे ओबीसी आंदोलकांवर हल्ले करण्यात आलेत. मात्र आता थेट सर्वोच्च न्यायालयात ओबीसींची बाजू मांडणाऱ्या ॲड. मंगेश ससाणे यांच्या गाडीवर हल्ला झाल्याने ओबीसी समाजातून संताप व्यक्त केला जात आहे..
.jpg)
.jpg)
टिप्पणी पोस्ट करा