DLM ADVT

0


 छत्रपती संभाजीनगरमधील साई कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमधील जवळपास दोनशे विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट मिळाले नसल्यानं कॉलेज समोर विद्यार्थी ठिय्या मांडले आहेत. परीक्षा फिस भरूनही परीक्षेपासून वंचित राहण्याची भीती आहे. 

हॉलतिकीट मिळाले नसल्याने काल या सर्व विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या परीक्षा विभागात धाव घेतली. यावेळी तुमच्या कॉलेजने परीक्षा शुल्कच भरले नसल्याने हॉलतिकीट मिळाले नसल्याचे सांगितले. रात्री उशिरा हॉल तिकीट दिल्याचे विद्यापीठाने सांगितले पण मुलांना मिळाले नाही, परीक्षा कशी द्यायची असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे. 

विद्यार्थ्यांकडून परीक्षा फी उकळून व्यवस्थापकांनी फोन केले बंद असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणे आहे. कॉलेजच्या गेटवर सर्व विद्यार्थी गोळा झाले आहेत. साई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इन मॅनेजमेंट या नावाने चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत एक कॉलेज आहे.

याठिकाणी एम सी एस प्रथम वर्गातून २१० विद्यार्थी आज परिक्षा देणार आहेत. परिक्षा संदर्भात सर्व अर्ज व फिस कॉलेजमध्ये जमा केली असुन कॉलेज परिक्षेकरीता हॉल टिकीट देत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. याकरिता २१० विद्यार्थी सद्यस्थितीत कालपासून कॉलेजमध्ये ठिय्या ठेवुन आहे

टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top