मुंबईत सामान्य नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या फरार बिल्डर वडील-मुलाच्या जोडीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे.
तांत्रिक तपास आणि गुप्तचर माहितीच्या आधारे कस्तुरबा मार्ग पोलिसांच्या विशेष पथकाने मिहिर जेठवा आणि अशोक जेठवा या दोन आरोपींना केरळच्या कोची शहरातून अटक केली. वृद्ध गुंतवणूकदारांसह शहरातील अनेक लोकांची 1 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आणि त्यांना सदनिका देण्याचे खोटे आश्वासन दिल्याचा आरोप या दोघांवर आहे.
आरोपी गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू आणि केरळसारख्या राज्यांमध्ये लपून बसले होते. आरोपींनी फसवणूक करण्यासाठी आणि पोलिसांपासून दूर राहण्यासाठी सायबर संस्थेकडून प्रशिक्षण घेतले होते. त्याचा त्यांनी पुरेपूर फायदा घेतला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींविरोधात मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत आणि न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंटही जारी केले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कस्तुरबा मार्ग पोलिसांच्या पथकाने ही संपूर्ण कारवाई केली. दोन्ही आरोपींना मुंबईत आणण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
.jpg)
टिप्पणी पोस्ट करा