DHULE | धुळ्यात खोल गल्लीत पहाटेच्या सुमारास धाडसी चोरी; भांडे दुकानातून 1 लाख 90 हजारांची रोकड लंपास तर चोरटा सीसीटीव्ही कॅमेरात कैद धुळे शहरातील अत्यंत वर्दळीच्या खोलगल्ली भागात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, एका प्रसिद्ध भांडे दुकानात मोठी चोरी झाली आहे. धुळे येथील खोलगल्ली क्रमांक 4 मधील ‘रमणलाल पूनमचंद जैन’ या दुकानातून अज्ञात चोरट्याने सुमारे दोन लाखांचा ऐवज लंपास केला.
दुकानाचे मालक सुरेश जैन हे वरच्या मजल्यावर झोपले असताना चोरट्याने शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. ही घटना पहाटे दोन वाजेनंतर घडल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. चोरट्याने गल्ल्यातील 1 लाख 80 हजार रुपये रोख आणि आठ ते दहा हजार रुपयांची चिल्लर असा एकूण 1 लाख 90हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. सकाळी आठ वाजता मालक दुकान उघडण्यासाठी खाली आले
असता, शटरचे कुलूप तुटलेले दिसल्याने हा प्रकार उघडकीस आला. सुदैवाने, चोरीची ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्यात चोरटा स्पष्टपणे दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांसह घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आता आरोपीचा कसून शोध घेत आहेत.
.jpg)
टिप्पणी पोस्ट करा