NAVI MUMBAI |मैत्रिणीच्याचं घरी केली सोन्याची चोरी; आरोपी महिलेला पोलिसांनी केली अटक पनवेलमधील कामोठे परिसरात मैत्रीवर विश्वास ठेवणं एका महिलेवर महागात पडलं. पीडित सविता हिने बाजारात जाताना तिच्या समोर राहणाऱ्या मैत्रीण मोनिका हिला घराची चावी दिली होती. परंतु सविता परत आल्यावर तिला धक्का बसला. घरातील सोन्याचे दागिने गायब होते,
दरवाजाला पूर्वीसारखंच कुलूप लावलेलं होतं. सुरुवातीला मोनिका हिने घरात गेल्याचं नाकारलं. त्यामुळे सविताने कामोठे पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं; पण त्यात चोरीसाठी कोणी येताना जाताना दिसत नव्हतं. त्यामुळे त्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर तज्ज्ञांकडे तपासणीसाठी पाठवला. तपासात डीव्हीआरशी छेडछाड झाल्याचं समोर आलं.
यावर पोलिसांनी संशयाच्या आधारावर मोनिका दिघे हिला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिने सांगितलं की दागिन्यांवर तिची नजर आधीपासून होती. २५ नोव्हेंबर रोजी सविता चावी देऊन गेल्यावर तिने सीसीटीव्हीत तांत्रिक बदल केले, घरात घुसून सुमारे २२.७ ग्रॅम सोनं चोरलं आणि शांतपणे बाहेर पडली. पोलिसांनी तिच्याकडून सर्व सोनं जप्त केलं आहे. मोनिका एका खासगी कंपनीत काम करते आणि तिचा पगार एक लाख रुपयांपेक्षा जास्त असूनही सोन्याच्या लोभाला तिने बळी पडल्याचं दिसून आलं. कोर्टाने तिला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
.jpg)
टिप्पणी पोस्ट करा