अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशनं हद्दीत येत असलेल्या संताजी नगरात येथे 30 नोव्हेंबर च्या सायंकाळी 45 वर्षीय निलिमा उर्फ पिंकी संजय खरबडे या महिलेचा संशयस्पद हत्येची घटना उघडकीस आली होती. हत्येनंतर अज्ञात आरोपी घरातील मृतकाचा मोबाईल घेऊन पसार झाला होता. या घटनेत पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, शाम घुगे सह राजापेठ पोलीस शहर गुन्हे शाखा पोलिसांनी धाव घेऊन प्रकरणाच्या तपासात लागले. या गुन्ह्यात पोलिसांनी काही संशयितांना चौकशी करिता ताब्यात घेतले.
अखेर कोणताही पुरावा नसतांना शहर गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण सह पथकाने खऱ्या मारेकरूचा शोध लावला. पिंकी खरबडे चा मारेकरू मोर्शी रोडवरील अशोक कॉलनीत राहनारा 32वर्षीय नितीन सुरेश इंगोले याला घरातून ताब्यात घेतले. त्यांची कसून विचारणा केली असता सर्व घटनेचे बिंग स्पष्ट झाले. आरोपी नितीन इंगोले याचे पिंकी खरबडे सोबत प्रेमसंबंध होते. दोन महिन्या आधी आरोपीचे इच्छे विरुद्ध लग्न झाले होते.
अशात पिंकी आणि नितीन मध्ये सतत वाद निर्माण व्हायचे. यालाच कंटाळून आरोपी ने घरात झोपलेल्या पिंकीच्या डोक्यावर खलबत्ताने जोरदार प्रहार करून तिला कायमचे संपविले. आरोपी नितीन हा अमरावती पाणीपुरवठा विभागात 12 वर्षापासून प्रयोग शाळा सहाय्यक पदावर कार्यरत होता.
अनैतिक संबंध आणि नेहमी वाद होत असल्यामुळे हत्या केल्याची कबुली आरोपी ने पोलिसां समोर स्पष्ट केली. या घटनेत आरोपी हा राजापेठ पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास राजापेठ पोलीस करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा