DLM ADVT

0

 

GONDIA |- सालेकसा नगरपंचायतीच्या ईव्हीएम मशीन छेडछाड प्रकरणी आज भाजप वगळता सर्व उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आणि तहसीलदारांना निवेदन दिले संबंधित उपविभागीय अधिकारी निवडणूक, अधिकारी निवडणूक, सहाय्यक अधिकारी यांना निलंबन करण्यात यावं अन्यथा आंदोलन छिनण्यात येईल आणि वेळ पडल्यास सालेकसा तालुका आणि परिसर बंद ठेवण्यात येईल असा इशाराही दिला.


 मात्र तहसीलदार यांनी राज्य निवडणूक आयोगांना याबाबतीत पत्रव्यवहार सुरू आहे आणि त्यांचा निर्णय येण्यास उशीर लागू शकतो त्यामुळे उद्या सायंकाळपर्यंतची मुदतवाढ मागितली त्यामुळे सर्व उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. आणि उद्या सायंकाळपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्णयाकडे लागलेल्या आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top