AHILYANAGAR राज्यभरातील विविध चोरीच्या प्रकरणात चर्चेत आलेल्या ‘बंटी–बबली’ जोडीतील बबली हिला आज शुक्रवार दि ०५ रोजी शेवगाव न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान मा न्यायालयाने हिला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी देण्याचे आदेश दिले.
सोशल मीडियावर रीलद्वारे सतत दिसणारी, हसतमुख आणि चंचल स्वभावाची आज मात्र काहीशी लंगडत न्यायालयात हजर झाली. पोलिसांनी आवश्यक ती वैद्यकीय तपासणी करूनच तिला न्यायालयात आणल्याचे सांगितले. राज्यभर चर्चेत असलेल्या या प्रकरणातील पुढील तपास शेवगाव पोलिसांकडून वेगाने सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.

टिप्पणी पोस्ट करा