DLM ADVT

0

 


मुंबई, दि. ०५ : सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या २० नोव्हेंबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ (सुधारीत अधिनियम, २०१५) अंतर्गत दाखल खून किंवा अत्याचारामुळे झालेल्या मृत्यूच्या प्रकरणांमध्ये दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसास शासकीय किंवा निमशासकीय सेवेत नोकरी देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

 या अनुषंगाने मुंबई उपनगर जिल्ह्यातील अशा प्रकरणांतील पात्र वारसांनी १० डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज करावे,असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहायक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, नवीन प्रशासकीय इमारत, ४ था मजला, आर. चेंबूरकर मार्ग, चेंबूर, मुंबई-७१ या कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top