नाशिकच्या गुन्हेगारी जगातील चर्चेत असलेल्या सातपूर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपींचा शोध घेण्यासाठी नाशिक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत आरोपी अटक करण्यासाठी विविध पथक रवाना केली होती. पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार हे दोन्ही संशयित आरोपी अटकेपासून वाचण्यासाठी सतत आपले ठिकाण बदलत होते. ते राजस्थान आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आश्रय घेत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती.
त्यानुसार नाशिक पोलिस पथक हे त्यांचा शोध घेत असताना त्यांनी पोलिसांना हुलकावणी देण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील बडौत येथे पोलिसांची त्यांना चाहूल लागताच, भूषण लोंढे आणि त्याच्या साथीदारांनी आश्रय घेतलेल्या ठिकाणाहून उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात मुख्य संशयित भूषण लोंढे याचे पाय फ्रॅक्चर झाले.तरी देखील या संशयितांनी येथून पळ काढत नेपाळ बॉर्डर जवळ मध्यप्रदेशात आश्रय घेतला होता.
या घटनेनंतरही आरोपी राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये फिरत होते. मात्र, नाशिक पोलिसांनी आपली गुप्तचर यंत्रणा आणि तांत्रिक विश्लेषण या दोन्हीचा योग्य वापर करत त्यांचा माग काढला. अखेर उत्तर प्रदेश-नेपाळ बॉर्डरजवळ असलेल्या महाराजगंज येथून या दोघांच्याही मुसक्या आवळण्यात नाशिक पोलिसांना यश आले आहे.
सातपूर गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी गजाआड झाल्यामुळे नाशिक पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे. गेल्या काही दिवसांपासून लोंढे टोळी ही सक्रीय होती. सातपूर निखिल गोळीबार प्रकरणाच्या टोळीचे नाव आल्यानंतर पोलिसांनी या टोळीचा बीमोड करण्यासाठी त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. या गुन्ह्यातील लोंढे टोळीतील मुख्य संशयित भूषण लोंढे आणि प्रिन्स सिंग हे गुन्हा घडल्यापासून फरार होते. अखेर नाशिक पोलिसांनी त्यांना नेपाळ भारत बॉर्डर जवळून अटक केली आहे. आज त्यांना नाशिक येथील गुन्हे शाखा दोन च्या कार्यालयात आणण्यात आल्या असून लवकरच त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
.jpg)
टिप्पणी पोस्ट करा