Nanded :- तरुणांची भररस्त्यात गुंडागर्दी, शहरातील मुख्य रस्त्यावर दगडफेक करत काठ्यांनी हाणामारी नांदेड शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतानाचे चित्र पहावयास मिळत आहे.
नांदेड शहरातील भाग्यनगर रस्त्यावर दोन टोळक्यांनी काठ्यांनी हाणामारी करत दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला आहे. टोळक्यातील तरुण हे महाविद्यालयीन तरुण असल्याचे दिसत होते.
दरम्यान या टोळक्यांनी भरस्त्यात वाद घालत, पळापळ करत एकमेकांवर दगडफेक केली. लाठ्या काठ्यांनी मारहाण करत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा