रत्नागिरी शहरात सलग तिसऱ्या दिवशीही आगीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आज सकाळी ११:०० वाजण्याच्या सुमारास मारुती मंदिर शिवाजी स्टेडियम परिसरातील गाळ्यांना लागून असलेल्या गाळ्यांना आणि गाळ्याच्या छतांवर शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
आज सकाळी अंदाजे ११:०० वाजता मारुती मंदिर शिवाजी स्टेडियमजवळील दुकानांचे गाळे आणि त्याखालील गाळ्यांच्या छतावर ‘शॉर्टसर्किट’मुळे आग लागली. प्राप्त माहितीनुसार, ही आग प्रथम दुकानाच्या गाळ्यांच्या छतावर लागली. आगीचे लोट आणि धुरामुळे परिसरात त्वरित गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेची माहिती मिळताच, परिसरातील जागरूक रहिवाशांनी कोणतीही वेळ न घालवता आग विझवण्याचे काम सुरू केले. मिळेल त्या साधनांनी, प्रामुख्याने पाण्याचा वापर करून आग नियंत्रणात आणण्याचा त्यांनी शर्थीचा प्रयत्न केला. त्याचबरोबर, आग मोठी होण्याची शक्यता लक्षात घेऊन तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले.
.jpg)
टिप्पणी पोस्ट करा