रात्रीच्या सुमारास बिबट्याने त्या कुत्र्यावर झडप घातली. त्यानंतर बिबट्याने कुत्र्याला लोखंडी खाटेसह फरफटच नेले. कुत्र्याच्या केकाटण्याचे आवाज ऐकून पाटील कुटुंबीय बाहेर आले. त्यावेळी त्यांच्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केल्याचे निदर्शनास आले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय. दरम्यान त्याच बिबट्याने त्या परिसरात असणाऱ्या अन्य दोन पाळीव कुत्र्यांवर ही हल्ला करून त्यांना ठार केल्याचा प्रकारही समोर आलाय.
सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिबट्याचा वावर दिसून येत आहे. नुकतेच कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे येथे एकाच ठिकाणी चार बिबटे दिसून आले होते. आता वाळवा तालुक्यातील कापूसखेड येथे कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून वन विभागाकडे केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा