BULDHANA | पुणे येथील भीमाशंकर मंदिरात सुरक्षा रक्षकाकडून बुलढाण्याच्या भाविकांना लोटपाट बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर येथील भगत कुटुंबं पुणे जिल्ह्यातील भीमा शंकर मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेले असता तेथील सुरक्षा रक्षकांनी त्या कुटुंबातील सर्व सदस्यांना लोटपाट करत वाद घातला, व दर्शनापासून वंचित ठेवले.
तीन तासापासून दर्शनासाठी रांगेत हे कुटुंबं उभे होते मात्र व्हीआयपी च्या नावाखाली 300 ते 500 रुपये घेऊन दुसरीकडे मंदिरात दर्शन दिले जात असल्याचा आरोप हनुमान भगत यांनी केला, ही बाब भगत यांनी सुरक्षा रक्षकांना विचारली असता हनुमान भगत, त्यांची पत्नी , मुलगा व चिमुकली यांना त्या सुरक्षा रक्षकांनी लोटपाट करून वाद घालत काढून दिल्याचे भगत सांगत आहे.
अश्या मंदिरात दर्शनासाठी सुरक्षा रक्षकांची अरेरावी व दादागिरी दिसून आली, मंदिर संस्थानी अश्या सुरक्षा रक्षकांना समज देण्याची मागणी भगत यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा