NASHIK | पाणीटंचाईमुळे त्रस्त महिलांनी पंचायत समितीसमोर आंदोलन छेडत प्रशासनाचे लक्ष वेधले राज्यात नगरपालिका निवडणुकांचा माहोल तापत असताना इगतपुरीमध्ये मात्र महिलांना पाण्यासाठी जीवघेणी पायपीट करावी लागत आहे.
आज इगतपुरीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत दणदणीत शक्तीप्रदर्शन झाले,
परंतु या राजकीय जल्लोषाच्या सावटाखाली इगतपुरीतील पाणीटंचाईचे गंभीर वास्तव मात्र झाकले गेले. पाणीटंचाईमुळे त्रस्त महिलांनी पंचायत समितीसमोर आंदोलन छेडत प्रशासनाचे लक्ष वेधले.
अधिकाऱ्यांनी दोन दिवसात समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले असले, तरी महिलांची दररोजची पायपीट नेमकी कधी थांबणार? हा मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे.
.jpg)
टिप्पणी पोस्ट करा