DLM ADVT

0

 

NANDED | नांदेडमध्ये भाजीपाला विक्रेत्याचा राडा; मनपाने पूर्वसूचना न देता पोलिसांचा वापर करून बाजार हटवल्याचा आरोप, भाजीपाला फेकून विक्रेत्यांनी केला मनपाच्या कारवाईचा निषेध 

 नांदेडमध्ये भाजीपाला विक्रेत्याने घातलेल्या राड्यामुळे बाजारपेठेत तणावाचे वातावरण निर्माण झाले. मनपा अधिकाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता पोलिसांच्या मदतीने भाजी बाजार हटवल्याचा गंभीर आरोप विक्रेत्यांकडून करण्यात आला आहे. 

घटनास्थळावर अचानक मनपा पथक आणि पोलिस दल दाखल झाले. त्यानंतर विक्रेत्यांचे गाडे व साहित्य हटवण्यात आले. यामुळे संतप्त झालेल्या एका विक्रेत्याने ठिकाणी गोंधळ घातला. भाजी पाला फेकून देऊन विक्रेत्यांनी निषेध व्यक्त केला असून विक्रेत्यांमध्येही नाराजी पसरली आहे. मनपाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top