BHANDARA | भंडाऱ्यात होणार नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 नागपूर परिक्षेत्रातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये शारीरिक तदुंरुस्ती राखणे, त्यांच्यात खिलाडूवृत्ती जोपासणे आणि परस्परांमधील एकोपा वाढवणे या उदात्त हेतूने 'नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२५' चे आयोजन करण्यात आले आहे.
यावर्षी या महत्त्वपूर्ण स्पर्धेचे यजमानपद भंडारा जिल्ह्याला मिळाले असून, दिनांक ०५ डिसेंबर २०२५ ते ०९ डिसेंबर २०२५ या कालावधीत भंडारा येथील पोलीस मुख्यालय मैदानावर हा क्रीडा महोत्सव पार पडणार आहे.
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये नागपूर परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, वर्धा आणि नागपूर (ग्रामीण) या सहा जिल्ह्यामधील पोलीस अधिकारी व अमलदार मोठ्या उत्साहाने सहभागी होणार आहेत. दैनंदिन कर्तव्याच्या व्यस्ततेतून वेळ काढून पोलीस बांधव आपल्या क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
.jpg)
टिप्पणी पोस्ट करा