NAGPUR | नागपूरमध्ये मध्यरात्री धक्कादायक घटना नातेवाईक मुलीसोबत खोलीत तरुण जखमी अवस्थेत, प्रेमसंबंधातूनच प्रकार? पोलिसांचा तपास सुरू - नागपूर शहरात काल मध्यरात्री नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत तरुणाचा त्याच्याच नातेवाईक असलेल्या मुलीसोबत जखमी अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे - बालाजी कल्याने असं मृतक तरुणाचं नाव आहे
.. - तो नागपुरात पोलीस भरतीच्या तयारीसाठी आला होता. नागपुरातील नंदनवन परिसरात मित्रासोबत भाड्याने घेतलेल्या रूम मध्ये राहत होता. - काल रात्री त्याची नातेवाईक असलेली मुलगी त्याच्या रूममध्ये आली. यावेळी त्याचा मित्र बाजूच्या रूममध्ये झोपलेला होता. - मध्यरात्री मात्र मुलाच्या छातीवर धारदार शस्त्राचे गंभीर वार केलेल्या अवस्थेत तर मुलगी तिच्या डोक्याला दुखापत झालेल्या अवस्थेत मिळून आले.
- या घटनेने एकच खळबळ उडाली आज नेमकं त्या खोलीत दोघे जण असताना घडलं याचा शोध सध्या पोलीस घेत आहे. - प्रेम प्रकरणातून गंभीर घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. - मुलीकडून सांगितले जात असलेल्या माहितीची पडताळणी करून तपासात याबद्दल स्पष्ट नेमकं काय घडलं ते सांगता येईल अशी माहिती नंदनवन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनायक कोळी यांनी सांगितलं.

टिप्पणी पोस्ट करा